पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्र बेहाल, कोकणात रत्नागिरी पाण्याखाली, अनेक भागांचा संपर्क तुटला

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणच्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आतापऱ्यंत आठजणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन काळात मदतीसाठी, नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ आणि वायुसेनेची पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसामुळे अनेक मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यानजिकच्या भीमाशंकर मंदिराच्या गर्भगृहापऱ्यंत पाणी पोहोचले आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाच्या मदतीसाठी वेस्टर्न नेव्हल कमांडने हेलिकॉप्टर आणि फूड रेस्क्यू टीम पाठवली आहे. नौसेनेची सात पथके रस्ता मार्गे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पाठविण्यात आली आहेत. कोल्हापूरमध्ये नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. तर सातारा जिल्ह्यात कोयना नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here