बीड : गजानन सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन, मोळी पूजन उत्साहात

बीड : नवगण राजुरी (ता. बीड) येथील श्री गजानन सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळीपूजन सोहळा संत महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, श्री गजानन सहकारी साखर कारखाना हा आपल्या सर्वांच्या हक्काचा कारखाना आहे. बीड, शिरूर (का.) व पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यायोग्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी मी या कारखान्याच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे. आगामी काळात या कारखान्याच्या प्रगतीसाठी काम केले जाईल. त्यामुळे जनतेने पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी यावेळी केले.

उपस्थित सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून समृद्धी व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील नवगण राजुरी येथे श्री गजानन सहकारी साखर कारखाना मोठ्या अडचणीतून सुरू केला आहे. तालुक्यातील व आजूबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला, याचे समाधान वाटते. आगामी काळात या कारखान्याच्या प्रगतीसाठी आपले असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या. कारखान्याच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करेन.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here