अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यास को-जनरेशन अवॉर्ड जाहीर

अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २०२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे. ओहोळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे.

ते म्हणाले, कारखान्यावर सभासद उत्पादक ऊस व कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून यावर्षी सुद्धा दहा लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीने स्पेशल कॅटेगिरी मधून सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार २०२४ या कारखान्यासाठी जाहीर झाला आहे. यापूर्वीही या पुरस्काराने थोरात कारखान्याचा दिल्ली येथे सन्मान झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, दुर्गाताई तांबे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here