पुणे : येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची २०२६-२०३१ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षपदासाठी छगन भोंगळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली. सलग दुसऱयांदा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीच्या सभेला संचालक राजवर्धन पाटील, वसंत मोहोळकर, पराग जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, राकेश शुक्ला, निलेश देवकर, राजेंद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभिषण नलवडे, अतुल शिंगाडे, हरिश्चंद्र पारेकर, अमोल जाधव, रत्नमाला पवार, सुमन व्यवहारे, आदी उपस्थित होते. निवडीनंतर ओमराजे बोत्रे-पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, अॅड. मनोहर चौधरी, पिंटू काळे, उत्तम जाधव, विक्रांत कोरटकर, मनोज मोरे, अशोक शिंदे, आबासाहेब शिंगाडे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, किरण पाटील, महादेव शेंडगे, अंकुश पाडुळे, कार्यकारी संचालक विजय शिर्के, महाव्यवस्थापक रणजीत तावरे आदींनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले.


















