साखर धंद्याचा पाय दिवसेंदिवस खोलातच चालला आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर कोसळत आहेत, साखर निर्यात जवळजवळ थांबली आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरगोदामे ओसंडून वाहात आहेत. या हंगामाची धुराडी विझतात तोच नव्या ऊसतोडीची तयारी सुरू झाली आहे. त्याला सामोरे जाताना यंदा प्रथमच साखर धंद्यात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कारखान्यांवरील ‘एफआरपी’चे ओझे वाढले असून ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची कशी, असा मुख्य प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. साखरेचा दर आणि शिल्लक साखरेचा मेळच लागत नसल्याने कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. कारखान्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. थकीत कर्जांचा बोजाही यामुळे वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या हंगामावर होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि त्यांच्या संघटना हे वास्तव कळत असल्याने अजून तरी शांत आहेत. मात्र सरकारने आता वेळ दवडून चालणार नाही. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय, राज्य साखर संघांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी झालेली बैठक सकारात्मकच म्हणावी लागेल. बहुसंख्य कारखानदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे असल्याने साखर कारखानदारीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. मात्र निवडणुका तोंडावर आल्याने हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांना शिष्टमंडळाने भेटण्याचा निर्णय झाला. कारखान्यांकडून विक्री केल्या जाणाऱ्या साखरेस क्विंटलला ३२०० रुपये देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. यावर पंतप्रधानच काय तो निर्णय घेऊ शकतात. याशिवाय इथेनॉलला दरवाढ, त्यावरील जीएसटीची कपात, साखर निर्यातीला अनुदान, या काही प्रमुख मागण्याही आहेत. सरकारने आतातरी राजकारणाची झूल उतरवून साखर धंद्याला बूस्ट द्यावा. प्रश्न कारखानदारांचा तर आहेच, त्याहून अधिक तो सामान्य आणि अडचणीतील शेतकऱ्यांचा आहे!
Recent Posts
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर स्थगिती नोव्हेंबरपर्यंत वाढवली
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर स्थगिती नोव्हेंबरपर्यंत वाढवली.आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा आणि राष्ट्रीय आपत्कालीन कायदा यासह संविधान आणि अनेक...
अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रवीण शिंदे
अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल...
एथेनॉल की वजह से मक्का किसानों को मिल रहे हैं बेहतर दाम: नितिन गडकरी
पुणे : केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने पुणे में आयोजित विश्व जैव ईंधन दिवस की 10वीं वर्षगांठ समारोह में सतत...
महाराष्ट्र के सबसे बड़े मल्टी-फीड एथेनॉल प्लांट्स में से एक के लिए MEDAS को...
मुंबई : मेडास इंजीनियरिंग डिज़ाइन प्राइवेट लिमिटेड (MEDAS), जो डिस्टिलरी, ब्रूअरी और खाद्य प्रसंस्करण समाधानों में विशेषज्ञता रखने वाली एक अग्रणी ईपीसी (इंजीनियरिंग, खरीद...
આગામી ત્રણ દિવસ માટે હિમાચલ પ્રદેશમાં ભારે વરસાદની IMD ની ચેતવણી
શિમલા : ભારતીય હવામાન વિભાગ (IMD) એ ફરી એકવાર હિમાચલ પ્રદેશ માટે ઓરેન્જ એલર્ટ જારી કર્યું છે, જેમાં મંગળવારથી ગુરુવારના મોડી રાત સુધી આગામી...
સેન્સેક્સ 369 અને નિફટી 97 પોઇન્ટ ઘટીને બંધ આવ્યા
ભારતીય બેન્ચમાર્ક સૂચકાંકો 12 ઓગસ્ટના રોજ નીચા સ્તરે બંધ થયા.
સેન્સેક્સ 368,48 પોઈન્ટ ઘટીને 80,235,59 પર બંધ થયો, જ્યારે નિફ્ટી 97,65 પોઈન્ટ ઘટીને 24,487,40 પર...
પાકિસ્તાન શુગર મિલ્સ એસોસિએશનના ગેરમાર્ગે દોરનારા ડેટાને કારણે ખાંડ નિકાસનો નિર્ણય લેવામાં આવ્યો: CCP...
કોમ્પિટિશન કમિશન ઓફ પાકિસ્તાન (CCP) એ જાહેર કર્યું છે કે ખોટા ડેટાને કારણે ખાંડ નિકાસ નીતિ ઉભી થઈ હતી જેના કારણે જનતા પર નોંધપાત્ર...