पुणे शहर आणि जिल्ह्यातील चार तालुक्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे; खडकवासला साखळीतील चारही धरणांत अवघ्या चार दिवसांत सुमारे पावणेसहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठा एकवीस टीएमसीवर पोहोचल्याने शहरासह जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पेयजलासह घरगुती वापर आणि सिंचन यासाठी पंधरा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पात रविवारपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवारी दिवसभर खडकवासला साखळीतील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत संततधार सुरूच होती. खडकवासला साखळीतील टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 69 आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळपर्यंत खडकवासला साखळीमध्ये असलेल्या चारही धरणांत 20.97 टीएमसी (71.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यात 5 हजार 136 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 29 आणि सायंकाळी पाचपर्यंत 27 मिलिमीटर पाऊस झाला. निरा-देवघरला सकाळ पर्यंत 67 आणि सायंकाळ पर्यंत 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भाटघरला सकाळ पर्यंत 17 आणि सायंकाळ पर्यंत 25 मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत 2.92 (74.14 टक्के), निरा-देवघर 8.27 (70.54 टक्के), भाटघर 15.72 (66.90 टक्के) आणि वीर धरणात 9.20 (97.83 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वीर धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने सोमवारी सकाळी डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2,150 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी त्यात 13 हजार 716 क्यूसेक वाढ करण्यात आली असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील खतौली येथील साखर कारखान्यात कथित उल्लंघन केल्याबद्दल मेसर्स त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडला १८ कोटी रुपयांची पर्यावरणीय भरपाई देण्याचा...
मुरादाबाद : उत्तर प्रदेश सरकारने २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी नवीन ऊस नोंदणी आणि पुरवठा धोरण जारी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ऊस...
New Delhi: India's Commerce Minister Piyush Goyal on Wednesday co-chaired a meeting with the business delegations from India and Germany, along with Johann Wadephul,...
In the previous article titled ‘Assessing sugar export in 2025-26 SS: How much sugar should India export?’ dated 1st September 2025, we talked about...
ન્યૂ યોર્ક: ભારત પર 'અતાર્કિક' ટેરિફ લાદવા બદલ યુએસ પ્રમુખ ડોનાલ્ડ ટ્રમ્પને સ્થાનિક સ્તરે ભારે ટીકાનો સામનો કરવો પડી રહ્યો છે. કેટલાક નિષ્ણાતોએ તેમને...