कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील साखर कारखाने प्रतिटन ३५१० रुपये दर देणार

कोल्हापूर : श्रेय घेण्यासाठी मी काम करत नाही, पण तिन्ही कारखान्यांचा दर एकच राहावा, या दृष्टीने मी प्रयत्न केले. ३१०० रुपयांवरून तो ३४०० रुपये दर कारखान्यांनी जाहीर केला. पण, राजू शेट्टींना ते झोंबल म्हणून त्यांनी कारखान्याला वेठीला धरले आणि ३५०० दर केला, पण त्यापुढे जाऊन कारखाना प्रशासनाशी चर्चा करून पहिली उचल ३४१० रुपये व गाळप हंगामानंतर १०० रुपये असा एकूण ३५१० रुपये दर द्यावा, अशी त्यांना विनंती केली आणि तो दर शेतकऱ्यांना मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, दोन मुख्यमंत्री चंदगडला आले हा विरोधकांनी निवडणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. पण, गोव्याचे मुख्यमंत्री हे कोल्हापूरला आले होते आमची भेट योगायोग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निदूरमध्ये घोषणा केल्याप्रमाणे मी पुन्हा येईन त्यानुसार ते येत असून, विरोधकांनी त्याचे भांडवल करू नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिन बल्लाळ, सुनील काणेकर, परशराम गावडे, रवींद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, तानाजी देसाई, श्रीशैल पाटील उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here