कोल्हापूर : भरारी पथकाने तपासले घोरपडे साखर कारखान्याचे वजनकाटे, बिनचूक असल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : राज्य सरकारच्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने भेट सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक तपासणी केली. कारखान्याच्या वजनकाट्यावर उसाने भरलेले वाहन व रिकामे वाहन अशी दोन ठिकाणी तपासणी व उलट तपासणी झाली. यामध्ये हा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. कारखान्याचे संस्थापक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यात शेतकऱ्याच्या हिताचा व पारदर्शक कारभार केला जात आहे. कारखान्याचा वजनकाटा बिनचूक व चोख असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार सहकारी संस्था साखर विभागाचे लेखापरीक्षक वर्ग-१ यू. एस. रावराणे, कागल पुरवठा निरीक्षक एस. बी. तोडसाम, वैधमापनशास्त्र निरीक्षक संतोष महादेव खाडे, मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल केणे यांचा भरारी पथकात समावेश होता. कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, इन्स्ट्रूमेंट मॅनेजर भूषण हिरेमठ, शेती अधिकारी गोकुळ मगदूम, केनयार्ड सुपरवायझर अमर माने उपस्थित होते. वैधमापन विभागाच्या पथकाने कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी केली. तपासामध्ये दोन ठिकाणी वजने करण्यात आली. यामध्ये सर्व वजनकाटे बिनचूक व चोख असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती पत्रकातून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here