बीड : गोदावरी नदीकाठावरील उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

बीड : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक ठिकाणी हुमणी अळीचा प्रकोप वाढला आहे. ही अळी उसाच्या बुडातच राहत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी उसाचे संरक्षण करण्यासाठी अळीला अटकाव करण्यासाठी धडपडत आहेत. गोदावरी नदीकाठावरील उसावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. हलक्या व कालव्यालगतच्या शेतजमिनीत अळीचा प्रसार वेगाने होत आहे.

पोषक वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पाणथळ जागेतही अळीने शिरकाव करून पिकाचे नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक हतबल झाले आहेत. दरम्यान, हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना खत दुकानदाराकडून मिळणारी औषधे वापरण्याशिवाय पर्याय नाही. काही ठिकाणी औषधाचा परिणाम होत असला तरी अनेकवेळा अपेक्षित फरक न पडल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे हुमणी अळीवर नेमकी कोणती उपाययोजना करावी, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. कृषी विभागाने हुमणी अळी नियंत्रणाबाबत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here