जालना साखर कारखान्यातून समृद्धी महामार्ग जाणार नसल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

जालना : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने शनिवारी (ता. दोन) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जालना साखर कारखान्यातून जाणारा नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करून तो इतरत्र वळवावा. हा कारखाना सुरू करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग हा कुठल्याही परिस्थितीत कारखान्यातून जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखाना बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अंकुश देशमुख, कमलाकर अंभोरे, नारायण वाडेकर, लक्ष्मण शिंदे आणि कैलास फुलारी आदींनी याबाबतची वस्तुस्थिती मांडली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हा रस्ता इतर भागातून वळवावा, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. सध्याच्या अलाइनमेंटनुसार रस्ता कारखान्यातून जाणार नाही, अशी ग्वाही देत हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here