सातारा : बाजीराव सुतार यांना ग्रीन वर्ल्ड रियल अचीवर्स ऑफ महाराष्ट्र २०२६ चा पुरस्कार

सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांना ‘रियल जी. अचीवर्स ऑफ महाराष्ट्र २०२६’ चा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुणे येथील ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी दिली. सदरचा पुरस्कार उद्योग, प्रशासकीय सेवा, सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शनिवार दि. २३ मे रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त, (छत्रपती संभाजी नगर) दिलीप गावडे व अजय केसरी इन्कम टॅक्स कमिशनर पुणे यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बाजीराव सुतार यांनी गेली ३९ वर्षे सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सध्या ते यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील त्यांचा सलग ३९ वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साखर कारखान्यांचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व कार्यक्षमतेने हाताळले आहे. तसेच कारखान्याच्या प्रभावी व्यवस्थापनात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सर्व विभागांमध्ये संगणकीकरण व ईआरपी सिस्टीमची प्रभावी अंमलबजावणी करून संस्थेच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक यांच्याशी त्यांनी नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध जपले आहेत. त्यांनी आजपर्यंत वसंतदादा, वारणा, इंदापूर, संजीवनी व आत्ता कृष्णा कारखान्यात कार्यरत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here