सांगली : राजारामबापू कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय वापराचे प्रशिक्षण शिबिर

सांगली : राजारामनगर (ता. वाळवा) येथील आरआयटी कॉलेजमध्ये ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आयोजित प्रशिक्षण शिबिरास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजारामबापू साखर कारखाना, पुण्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामतीची कृषी विज्ञान केंद्र यांच्या – संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) बारामतीचे डॉ. विवेक भोईटे, व्हीएसआयचे डॉ. समाधान सुरवसे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. भोईटे आणि डॉ. सुरवसे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक व शाश्वत, अचूक उत्पादनक्षम होणार असल्याचे सांगितले. फसल कंपनीचे नितीन शिंदे यांनी सेन्सार तंत्रज्ञानाची माहिती देत त्याचे फायदे आणि वापर पद्धती विशद केली. अरुण पडोल यांनी अॅपच्या माध्यमातून पीक निरीक्षण, रोगनियंत्रण व उत्पादन वाढीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली. माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी व्हीएसआय आणि केव्हीकेचे शास्त्रज्ञ आणि ऊस उत्पादकांमध्ये संवाद घडवून अनेक प्रश्नांची उकल केली. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. शेती समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले. विनायक पाटील, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, अतुल पाटील, उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here