श्री गणेश कारखान्याच्या कामकाजात विखे कारखान्याकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न : अध्यक्ष सुधीर लहारे

अहिल्यानगर : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून, न्यायालयीन तसेच आर्थिक पातळीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी केला आहे. २०२४ मध्ये प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यात साखर आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली. गळीत हंगाम शुभारंभाच्या दिवशी संचालक मंडळाला नोटिसाही बजावण्यात आल्या. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने प्रवरा कारखान्याच्या दोन्ही याचिका फेटाळून लावत गणेश कारखान्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही आर्थिक व्यवस्थापन, कर्ज प्रक्रिया तसेच ऊस पळवापळवीच्या माध्यमातून गणेश कारखान्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लहारे यांनी केला आहे. उच्च न्यायालयातील दोन्ही याचिका फेटाळल्यानंतरही अडचणीत आण्याची प्रक्रीया थांबलेली नाही, असेही ते म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here