कोल्हापूर : ‘अन्न औषध’च्या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादन बंद गूळ उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णय

कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यातील गुन्हाळ घरांवर धाडी टाकत सुरू असलेल्या कारवाईचा धसका जिल्ह्यातील गूळ उत्पादकांनी घेतला आहे. सोमवारपासून (दि.८) गूळ उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काही गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील काही गूळ व्यापाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार आजपासून समितीमधील गूळ सौदे बंद राहण्याची शक्यता आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यभर भेसळखोरां विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. गुळामध्ये साखर व रंगाचा वापर होत असल्याने काही ठिकाणी कारवाई झाली आहे. या कारवाईचा धसका राज्यभरातील गूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी यांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील काही गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकत भेसळयुक्त गूळ मिळाल्याने ती गुन्हाळघरे सील करत संबंधित गुऱ्हाळ मालकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या पुणे, सांगली, निरा येथील बाजार समितींमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून गुळाचे सौदे बंद राहिले आहेत. या कारवाईचा धसका आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

गुळाचे उत्पादन कमी होत असल्याने समितीमध्ये सध्या दिवसाआड गुळ सौदे सुरू आहेत. सोमवारी निघालेल्या सौद्यात समितीमध्ये ३० किलो वजनाच्या ३,३८६ गुळ रव्यांची आवक झाली. सौद्यादरम्यान गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारपासून गूळ उत्पादन बंद करणार असल्याचे सांगितले. दिवसाआड सौदे निघत असल्याने आज (बुधवारी) सौदे निघणार आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here