‘पाणीबाणी’ : देशातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी; केंद्रीय जल आयोगाचा अहवाल

नवी दिल्ली : केंद्रीय जल आयोगाने (CWC) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, देशातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटला आहे. देशभरातील 166 प्रमुख धरणांवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, 25 जून 2026 रोजी या धरणांमध्ये एकूण 48.405 अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणीसाठा होता. हा साठा धरणांच्या एकूण 183.565 बीसीएम उपयुक्त जलसाठा क्षमतेच्या 26.37 टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 66.114 बीसीएम पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदाचा पाणीसाठा हा गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ 73.21 टक्के इतकाच राहिला आहे.

विभागनिहाय स्थिती…

ChiniMandi WhatsApp Channel

मध्य भारत (छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड) हा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा विभाग ठरला आहे. या भागातील धरणांमध्ये 15.667 बीसीएम, म्हणजेच एकूण क्षमतेच्या 32.24 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या 29.29 टक्के आणि सरासरी 26.46 टक्के पातळीपेक्षा अधिक आहे.उत्तर विभागात (हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान) धरणांमध्ये 6.066 बीसीएम, म्हणजे 30.58 टक्के पाणीसाठा असून, तो गेल्या वर्षीच्या 31.89 टक्के पातळीपेक्षा किंचित कमी आहे.पश्चिम विभागात (गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र) 10.862 बीसीएम, म्हणजे 28.51 टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 37.69 टक्के होता.

पूर्व विभागात (आसाम, बिहार, झारखंड, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल) परिस्थिती चिंताजनक असून, येथे 4.334 बीसीएम, म्हणजे 19.92 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या 29.89 टक्के पातळीपेक्षा खूपच कमी आहे.दक्षिण विभागात (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा) 11.476 बीसीएम, म्हणजे 20.76 टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा साठा 44.67 टक्के होता.

नदी खोऱ्यानुसार स्थिती…

अहवालानुसार गंगा, सिंधू, नर्मदा, माही, तापी, साबरमती, गोदावरी, पेन्नार, ब्रह्मपुत्र, महानदी, तसेच पेन्नार ते कन्याकुमारी दरम्यान पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि कच्छ-सौराष्ट्रातील (लूणीसह) पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाणीसाठा सामान्यपेक्षा अधिक आहे.तापी ते तदरी दरम्यान पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांतील पाणीसाठा सामान्य पातळीच्या जवळपास आहे.मात्र कृष्णा, कावेरी, ब्राह्मणी-बैतरणी, सुवर्णरेखा, बराक, महानदी ते पेन्नार दरम्यान पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या तसेच तदरी ते कन्याकुमारी दरम्यान पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाणीसाठा सामान्यपेक्षा कमी आढळला आहे. मात्र कोणत्याही नदी खोऱ्याला अत्यंत तुटीच्या (Highly Deficient) श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.

राज्यनिहाय स्थिती…

अहवालानुसार आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. तर आंध्र प्रदेश, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here