पुणे : अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन गायकर यांच्याकडून आधुनिक ऊस शेतीची पाहणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील पारगाव येथे प्रगतशील शेतकरी तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास हरिभाऊ चव्हाण यांच्या आधुनिक ऊस शेतीची अगस्ती सहकारी साखर कारखाना, अगस्तीनगर (ता. अकोले) चे चेअरमन सिताराम गायकर यांनी पाहणी केली. त्यांनी ऊस उत्पादनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. गायकर यांनी जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आधुनिक ऊस शेतीचे तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. अगस्ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अशा उपक्रमांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कृषी पदवीधर वैभव चव्हाण, विशाल चव्हाण, जय चव्हाण आणि विजय चव्हाण यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. या भेटीद्वारे आधुनिक ऊस शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, प्रगतशील शेतकर्यांचे अनुभव आणि शाश्वत शेती पद्धतींची देवाणघेवाण झाली. विकास चव्हाण यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी सुपर केन रोपवाटिका, ऊस बेणे मळा, शास्त्रशुद्ध रोपनिर्मिती, आधुनिक नर्सरी व्यवस्थापन, ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती गायकर यांना दिली. कमी उत्पादन खर्चात अधिक ऊस उत्पादन मिळविण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रयोगांचे त्यांनी सादरीकरण केले. यानंतर गायकर यांनी गोपालकृष्ण पतसंस्था आणि अॅग्रो प्लस सिडलिंग नर्सरी येथे भेट देऊन आधुनिक रोपनिर्मिती, बेणे मळा आणि नर्सरी व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी प्रगतशील शेतकरी कैलास आरोटे, गोपालकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here