कमी पाण्यात जादा ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान फायद्याचे : व्हीएसआय उपाध्यक्ष, आमदार दिलीप वळसे-पाटील

पुणे : ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी पाण्यामध्ये उत्पादन वाढविणे साखर कारखान्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. मांजरीतील व्हीएसआयच्या मुख्यालयात हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावरील परिणाम या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा व हार्वेस्टर ऑपरेटर प्रशिक्षणाचे उ‌द्घाटन मंगळवारी वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे कमी होत असलेले दिवस आणि वाढलेली गाळप क्षमता पाहता कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे चालवणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे इतर प्रयत्नांची गरज आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष वळसे-पाटील म्हणाले की, यावेळी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले की, हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील ऊस गाळप हंगाम साखर कारखान्यांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादन व गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून साखर कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम व्यापक आणि प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी, साखर कारखाने आणि संशोधन संस्थांनी समन्वयाने कार्य केल्यास या आव्हानांवर निश्चितपणे मात करता येईल, असा विश्वास आहे. यावेळी व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कड्डू पाटील, प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. अशोक कडलग, राजकोट येथील तीर्थ अॅग्रोटेकचे उपाध्यक्ष विश्व सोमनवार आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here