सातारा : श्रीराम कारखाना स्वतःच्या हिमतीवर चालविण्याचे रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधकांना आव्हान

सातारा : आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी श्रीराम कारखाना भागीदारी तत्त्वावर इतरांना चालवण्यासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर चालवून दाखवा, असे आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला असून, त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यासाठी मी कुणाकडूनही रुपया घेतला नाही. तुम्ही आजोबांनी काढलेल्या सगळ्या सहकारी संस्था विकल्या. आम्ही केवळ कारखाना नव्हे तर डेअरीही स्वतःच्या हिमतीवर चालवली होती. तुम्हीही तुमच्या हिमतीवर कारखाना चालवून दाखवा. श्रीराम कारखाना चालविण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी फलटण तालुक्यातील अनेकांचे भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने विरोधकांना ते पाहवत नसल्याची टीकाही केली. ते म्हणाले, रामराजेंच्या शिव्याशापांकडे आम्ही लक्ष देत नाही. ते तालुक्यात नकारात्मकता पसरवत आहेत. माझा स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला आहे. त्यासाठी मी कुणाकडूनही रुपया घेतला नाही. यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नरसिंह निकम, अमरसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, अमित रणवरे, रणजितसिंह भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here