सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ४ लाख टन साखर विक्रीची सक्ती

सांगली : लागणार १५ जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मंजूर पंधरवड्याच्या कोट्यापैकी किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकणे बंधनकारक असून, उर्वरित साखर पुढील आठवड्यात विकावी आहे. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी सप्टेंबरपर्यंत चार लाख १० हजार २९० टन साखर विक्री करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. वेळेत साखर विक्री करून अहवाल सादर न केल्यास संबंधीत कारखान्यांवर कारवाईचा इशाराही केंद्र शासनाने दिला आहे.

१८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पहिल्या पंधरवड्याच्या अखेरीस उपलब्ध असलेला साठा, झालेले उत्पादन, विक्री व उचल, वितरित केलेली साखर तसेच अंतिम साठा यांचा तपशील नोंदणीकृत ई-मेलद्वारे संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. कारखान्यांनी विक्री केलेली साखर विक्रीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत कारखान्यातून पाठविणे बंधनकारक केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

केंद्र व राज्य शासनाकडून विशेष संयुक्त तपासणी मोहिमेदरम्यान साखर पाठविल्याची कर बिले तपासून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व साखर कारखान्यांनी ऑगस्ट २०२६ महिन्याचा पी-२ अहवाल ७ सप्टेंबर पर्यंत सादर केला पाहिजे. नियमांचे पालन न करणाऱ्या साखर कारखान्यांना पुढील पंधरवड्यासाठी कोणताही साखर विक्री कोटा मंजूर केला जाणार नाही, अशा सूचनाही केंद्र शासनाने दिल्या आहेत.

खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई

जुलै २०२६ च्या अहवालात चुकीची अथवा खोटी माहिती देणाऱ्या कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येत आहेत. उत्तर प्राप्त झाल्यानंतर आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत पुढील कार्यवाही होणार आहे. एकापेक्षा अधिक साखर उत्पादन केंद्रे असलेल्या समूहातील उत्पादक कंपन्यांना आदेशातील तरतुदीनुसार साठा प्रत्येक केंद्रानुसार किंवा संपूर्ण समूहासाठी एकत्रित स्वरूपात ठेवता येणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here