कर्नाटक : ऊस विकासामध्ये चिदानंद कोरे कारखाना देशात अव्लल, मिळवला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

बेळगाव : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मंगळवारी (ता. २२) झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरे कारखान्याने कार्यक्षेत्रात ऊस विकासासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन व उताऱ्यात वाढ करण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कारखाना कार्यक्षेत्रात उत्कृष्ट ऊस विकासासाठी हा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन केले जाते. त्याअंतर्गत हा पुरस्कार मिळाला. कार्यक्रमात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे तथा कारखान्याचे संचालक अमित कोरे, संचालक अण्णासाहेब जोल्ले आणि कारखान्याचे अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, कारखान्याचे मार्गदर्शक पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक आणि केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष अमित प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेले योग्य निर्णय, शेतकऱ्यांचे सहकार्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here