पुणे : नीरा-भीमा कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेला झळाळी, नॅशनल फेडरेशनकडून पुरस्कार

पुणे : शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याला सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीबद्दल नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक व साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आणि संचालक मंडळाने हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारला. कारखान्याला आजवर राज्य व देशपातळीवरील एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. या नव्या पुरस्काराने कारखान्याच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवरील नोंद आणखी ठळक झाली असे त्या म्हणाल्या.

कारखान्याच्यावतीने पुरस्कार स्वीकारताना लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, साखर कारखान्यास मिळालेला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार हा शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, संचालक मंडळ, अधिकार आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कष्टांचा गौरव आहे. रौप्यमहोत्सवी गळीत हंगामात मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here