नवी दिल्ली : सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राइमचा धोका वाढला आहे. याबाबत गुन्ह्यांची तिव्रता बुधवारी लोकसभेतही अधोरेखित झाली. चालू वर्षात आतापर्यंत 3,13,000 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आयटी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.
2017 च्या तुलनेत या गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले. धोत्रे म्हणाले, की या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. खासगी तसेच, आस्थापनांतील सर्व्हर आदी यंत्रणांची सुरक्षा सतत चोख असणे आवश्यक आहे. या गुन्ह्यांमध्ये वेबसाइट हॅकिंग, फिशिंग आदीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.















