ऊस दरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन, संघर्ष समितीवर टेंभुर्णीत गुन्हा दाखल

टेंभुर्णी-कुर्डुवाडी मार्गावरील सोलापूर-पुणे महामार्ग बायपास चौकात ऊस संघर्ष समिती शेतकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आगामी दोन दिवसांत पहिली उचल २,५०० व अंतिम दर ३१०० रुपये जाहीर न केल्यास पंढरपूर येथे ४४ साखर कारखानदारांचा दशक्रिया विधी आंदोलन केले जाईल असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्य मराठीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंदोलनस्थळी संजय कोकाटे यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांनी आंदोलनात एकी टिकवून ठेवली तर जास्त पैसे मिळू शकतात. यंदा गाळपाला पुरेसा ऊस नाही. त्यामुळे कारखानदारांना उसाची गरज पडणार आहे. उसाचे कुठेही वजन करून आणा असे आवाहन कारखानदार करतात. मात्र, खासगी काट्यांवर वजन करू दिले जात नाही. वजनात घट करून उताराही कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हे प्रकार थांबवावेत. यावेळी अतुल खुपसे, दीपक भोसले यांची भाषणे झाली. संजय पाटील घाटणेकर, समाधान फाटे, प्रा. सुहास पाटील, माउली हळनवर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here