कुशीनगर : कुशीनगर जिल्ह्यातील ढाडा साखर कारखान्यात डिस्टिलरी प्लांट बसविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एकूण ३५ एकर क्षेत्रात या प्लांटची स्थापना केली जाणार आहे. यासाठी साखर कारखान्यालगत जमीन घेण्यात आली आहे. या प्लांट मुळे युवकांना रोजगार मिळणार आहे.
हाटा तहसील क्षेत्रातील ढाडामध्ये डिस्टिलरी प्लांट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे १५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ३५ एकरामध्ये असेल. यासाठी कारखान्याच्या शेजारी जमिनीचा शोध घेण्यात आला. लवकरच याचे काम सुरू होईल. त्यातून युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्लांटसाठी व्यवस्थापनाकडून निधीचे वितरण झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता फक्त प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया आहे.
न्यू इंडिया शुगर मिलचे सरव्यवस्थापक करण सिंह यांनी सांगितले की, कारखाना परिसरात डिस्टिलरी प्लांटसाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. एका वर्षात प्लांट तयार होईल. याची क्षमता प्रती दिन १०० किलोलीटर आहे. वरिष्ठ ऊस प्रबंधक डी. डी. सिंह यांनी सांगितले की, डिस्टिलरी प्लांटचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्लांटसाठी मुख्यमंत्री आणि औद्योगिक विकास मंत्र्यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link