बाजारात आला ऊसाच्या वेस्टपासून बनलेला फेस मास्क, 30 वेळा करु शकतो वापर

144

नवी दिल्ली: कोरोना मुळे जिथे मास्कची मागणी वाढली आहे तिथे तिथे नवे संकट अर्थात बायोमेडिकल वेस्टचे संकट निर्माण झाले आहे. फेकल्या गेलेल्या मास्क, ग्लव्हजमुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. दिल्लीतील एक कंपनी एफिबार ने ऊसाच्या वेस्टपासून मास्क तयार केला आहे. आणि हा मास्क 30 वेळा वापरु शकतो. शिवाय जर हा मास्क जमीनीत पुरला तर तो डिकंपोज होतो.

एफिबार ग्रुपचे फाउंडर राजेश भारद्वाज यांनी सांगितले की, बायोफेस मास्क एक बायोडिग्रेडेबल मास्क आहे. यामध्ये अ‍ॅन्टी बॅक्टीरिया प्रॉपर्टीही आहे. कारण हे पीएलए कम्पाउंड आणि पॉलिएटीक अ‍ॅसिडने बनलेले आहे. यासाठी हा मास्क बायोडिग्रेडेबल आणि अ‍ॅन्टी बॅक्टीरीयल मास्क आहे. ते म्हणाले, हा मास्क आपण 30 वेळा धुवू शकतो आणि वापरु शकतो.

या बायोमास्कमुळे आपल्याला रोज मास्क बदलण्याची गरज नाही. बायोमास पासून बनलेल्या मास्कचा वापर केल्यानंतर तो जमीनीत घातल्यावर डिकंपोज होवून जातो.

बायोमास्क ची टेक्नॉलॉची जपान च्या टीवीएम कंपनी लिमिटेडची आहे. आणि एफिबार ने या कंपनीबरोबर करार केला आहे. कंपनी लोकलाईजेशन वर फोकस करत आहे. इकॉनॉमी बायोमास्कची किंमत 145 ते 150 रुपये आहे. तर प्रीमियम मास्कची किंमत 450 ते 500 रुपये आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here