सोलापूरच्या शेतकऱ्याने काढले एकरी १११ टन उसाचे उत्पादन

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ‘ऊस उद्दिष्ट १०० टन प्लस’ योजनेत टेंभुर्णी येथील मच्छिद्र कृष्णा देशमुख या शेतकऱ्याने ११७ गुंठे क्षेत्रात ३२७ मेट्रिक टन म्हणजेच प्रति एकरी १११ मेट्रिक टन ऊस उत्पादन मिळवले आहे. यासाठी त्यांना कृषिरत्न डॉ. संजीव माने, कार्यकारी संचालक संतोष डीग्रजे, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, केन मॅनेजर संभाजी थीटे, ऊस भूषण बागायतदार सोमनाथ हुलगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

मच्छिद्र देशमुख यांनी आपल्या ११७ गुंठे जमिनीची उन्हाळ्यात मशागत करुन पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात पाच फूट रुंदीची सरी सोडून को ८६०३२ ऊस वाणाचे प्रक्रिया केलेले बेण्याची २८ जून २०२२ रोजी आडसाली लागण केली. देशमुख यांनी सेंद्रिय खताचा योग्य वापर करून ‘ऊस संजीवनी चार्ट’प्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करून योग्य वेळी तणनाशक तसेच रोग व किडी निवारण वापरले. पाण्याचे नियोजन ठिबक सिंचनद्वारे केले होते. निमगाव (टें) येथील हनुमंत उत्तम खापरे यांनी देखील १४१ गुंठ्यात ३६४ मे.टन म्हणजेच प्रति एकरी १०३ टन उसाचे उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here