ऊसतोड मजुरांच्या वसाहतीला आग

सोमेश्‍वर : गेल्या वर्षीचा महापूर आणि दुष्काळ, शिवाय त्यातच आता कोरोना आणि त्यामुळे लागू झालेला लॉकडाउन यामुळे ऊस तोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच सोमेश्‍वर कारखाना कार्यस्थळावरील मोकळ्या जागेत असणार्‍या ऊस तोड मजुरांच्या वसाहतीला आग लागली. ही आग शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागली. आगीमध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा मात्र जळून खाक झाला, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ऊस तोड मजुरांच्या वसाहतीमध्ये पाचटाला भीषण आग लागली. तसेच संध्याकाळी जोराचा वारा असल्याने या आगीने भयानक रुप धारण केल्याने मजुरांची वसाहत आगीच्या तडाख्यात सापडली. आगीचे वृत्त समजताच कारखान्याच्या अग्निशामक बंबाने आग नियंत्रणात आणण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र सोसाट्याचा वारा असल्याने आगीवरील नियंत्रण सुटले.

या दुर्घटनेची माहिती समजताच घटनास्थळी लगेचच वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड यांनी भेट दिली. सोमेश्‍वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेर निरा जूबिलंटचा अग्निशामक बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here