शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळण्यासाठी मुजफ्फरनगरमध्ये होणार गुळ रिसर्च सेंटर

लखनऊ: आत्मनिर्भर भारत अभियानास गती देणे आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन गुळ रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहेत. ही रिसर्च सेंटर्स मुजफ्फरनगर, शाहजहांपूर आणि कुशीनगर मध्ये स्थापन करण्यात येणार आहेत. गावांमध्ये गुळ आणि गुर्‍हाळांच्या उद्योंगांना वाढवण्यासाठी सरकार विशेष योजना तयार करत आहे. गुळाच्या चांगल्या निर्यातीच्या शक्यता पाहून सेंद्रिय गुळालाही प्रोत्साहन दिले जाईल.

शनिवारी उत्तर प्रदेश ऊस शोध परिषदेचे केंद्र प्रभारी आणि वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर यूपी चे ऊस विकास मंत्री सुरेश राणा म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितार्थ नव्या प्रजाती आणण्यासाठी शोध कार्यात गती आणण्याचे निर्देश दिले गेले आहेत. अशा प्रजातीच्या ऊसाला प्रोत्साहित करण्यात येईल, ज्या मुले कमी पैशात अधिक उत्पादन देतील. तसेच रोगाविरोधात लढण्याची क्षमता त्या प्रजातींची अधिक असेल.

यूपी चे ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, गावांमध्ये गुळ आणि गुर्‍हाळांच्या उद्योगाला गती देण्यासाठी सरकार विशेष योजना बनवत आहे. ते म्हणाले, ओडीओपी अंतर्गत मुजफ्फरनगर मध्ये गुळ उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. शंभरपेक्षा अधिक पद्धतीने गुळ बनवला जात आहे. गुळ निर्यातीची शक्यताही असल्याने जैविक गुळाला प्रोत्साहन दिले जाईल. या बैठक़ीमध्ये डॉ. जें सिंह, डॉ. वीरेश सिंह, राघवेंद्र सिंह, प्रताप सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here