गळीत हंगाम तारीख निश्चितीसाठी मंत्री समितीची आठवडाभरात बैठक

पुणे : राज्यात १ नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गळीप हंगाम सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र गळीत हंगामाची अधिकृत तारीख ठरलेली नाही. येत्या पाच-सहा दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हंगामाविषयीचा निर्णय होईल, अशी साखर संकुलातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात यावर्षी आत्तापर्यंत २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यानंतर या कारखान्यांना परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत साखर आयुक्तालयातील विकास शाखेचे सहाय्यक संचालक सचिन बऱ्हाटे यांनी सांगितले की, मंत्री समितीला १ नोव्हेंबर ही तारीख कळविण्यात आली आहे. त्यांच्या बैठकीमध्ये यावर निर्णय होईल. गाळप परवान्यासाठी आमच्याकडे २१७ कारखान्यांचे अर्ज आले आहेत. कमी उसामुळे यंदा मार्च महिन्यापर्यंत गळीत हंगाम सुरू राहील अशी शक्यता आहे.

दरम्यान, यंदा लांबलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील ऊस शेतीला फटका बसला. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाअभावी अनेक धरणांत कमी पाऊस आहे. सध्याच्या परतीच्या पावसाने धरणे भरतील अशी शक्यता नाही. त्यायामुळे ऊस, साखर उत्पादनावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी लागू करेल अशी चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here