बांगलादेशातील ६ बंद साखर कारखान्यांसाठी आशेचा किरण

235

ढाका : बांगलादेशातील ६ बंद साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनला (बीएसएफआयसी) कायमस्वरुपी बनविण्याच्या आपल्या योजनेअंतर्गत सरकार सहा बंद कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांशी करार करण्याच्या प्रयत्न करीत आहे. थायलंडच्या सुटेक इंजिनीअरिंग कंपनी, संयुक्त अरब अमिरातमधील शार्कारा इंटरनॅशनल आणि जपानच्या सोजित्ज मशीनरी कॉर्पोरेशनच्या प्रस्तावानुसार सहा कारखान्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी १ बिलियन डॉलरची (जवळपास ८००० कोटी Tk) गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली आहे. तोटा वाढल्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पबना साखर कारखाना, श्यामपूर साखर कारखाना, सेताबगंज साखर कारखाना, कुश्तिया साखर कारखाना, पंचगढ साखर कारखाना आणि रंगपूर साखर कारखाना बंद करण्यात आला होता.

बीएसएफआयसीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सहा कारखान्यांना ३८० कोटी Tk तोटा झाला होता. यामध्ये सेताबगंज साखर कारखान्याला सर्वाधिक ८४ कोटी Tk तोटा झाला होता. गुंतवणूकदारांचे स्थानिक प्रतिनिधी मोहम्मद इमदाद हुसैन यांनी सांगितले की, कन्सोर्टियमसोबत अंतिम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ३० महिन्यांत सहा कारखान्यांमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू होईल. गुंतवणूक केल्या जाणाऱ्या १ बिलियन डॉलरमधून जपान बँक फॉर इंटरनॅशनल को ऑपरेशन आणि निर्यात-आयात बँक ऑफ थायलंड ७० टक्के निधी देईल. आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि २०१९-२० या दरम्यान, बीएसएफआयसीला ३,९७६ कोटी Tk तोटा झाला आहे. यातील जवळपास ७८९५ कोटी Tk बँकेचे कर्ज आणि कामगारांची ५२१.८ Tk थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here