गेल्या चोवीस तासात विक्रमी 75,760 नवे कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा 60 हजारावर

भ़ारतामध्ये कोंविड 19 च्या रुग्णसंख्येने 33 लाखचा आकडा पार केला आहे. गुरुवारी कोरोना संक्रमणाच्या संख्येत आतापर्यंत सर्वात मोठी वाढ समोर आली आहे. गुरुवारी 75,760 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर कारोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या 25 लाखापेक्षा अधिक झाली आहे.

गुरुवारी सकाळी आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 1,023 लोकांचा मृत्यु झाल्याने मृतांचा आकडा वाढून 60,472 झाला आहे. देशामध्ये कोरोनाची प्रकरणे वाढून 33,10,235 रुग्ण झाले आहेत, ज्यापैकी 7,25,991 लोकांवर उपचार सुरु आहेत आणि 25,23,772 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
आकड्यांनुसार रुग्ण बरे होण्याचा दर 76.24 टक्के झाला आहे, तर मृत्यु दरामध्ये घट झाली आहे आणि हे 1.83 टक्के आहे. तर 21.93 टक्के रुग्णांवर अजून इलाज सुरु आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडुन जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशभरामध्ये 26 ऑगस्टपर्यंत एकूण 3,85,76,510 नमुन्यांची तपासणी केली, ज्यामध्ये बुधवारी एक दिवसामध्ये 9,24,998 नमुन्यांची चाचणी केली. भारतामध्ये सात ऑगस्टला कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखाच्या पुढे पोचली होती आणि 23 ऑगस्टला 30 लाखाच्या पुढे गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here