निमगाव येथे शॉर्ट सर्किटने दोन एकरातील ऊस जळाला

सोलापूर : निमगाव येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली. या आगीत तानाजीराव मगर यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील आडसाली ८६०३२ ऊस खाक झाला. आगीत संपूर्ण ऊस ठिबकच्या पाईपसह जळून गेला. त्यामुळे तानाजीराव मगर यांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाऱ्याचा वेग असल्याने उसाने पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यात शेतकरी अपयशी ठरले. तलाठी कोगुरुवार यांनी पंचनामा केला. या आगीच्या घटनेबद्दल वेळापूर येथील विद्युत मंडळाला कळविण्यात आले आहे. सध्या साखर कारखाना बंद असल्याने जळीत उसाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here