साखरेची वाहतूक करणारा ट्रक झाडावर आदळून दोघे जखमी

कोल्हापूर : आजरा मार्गावर साखर घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रकचे टायर फुटल्याने झाडावर जाऊन आदळला. यात चालकासहीत क्लिनरही जखमी झाला आहे.

हा ट्रक -एम.एच. १९. बी. ए. ०१९१ कोल्हापूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ग्रामस्थांनकडून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. अपघातामुळे मार्गावर वाहतूक खोळंबली होती. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. प्रशासकीय यंत्रणा तसेच ग्रामस्थांतर्फे मदतीचे कार्य सुरुहोते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here