कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता माळवली, २८७ दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण सुरू आहे. काल, सोमवारी २८७ दिवसानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात ८,८६५ नवे रुग्ण दाखल झाले असून १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात ११ हजार ९७१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे ३३०३ अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख ५६ हजार लोक संक्रमित झाले असून यापैकी ४ लाख ६३ हजार ८५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ६१ हजार जण बरे झाले आहेत. देशात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १.५ लाखाहून कमी झाली आहे. एकूण १ लाख ३० हजार ७९३ जण कोरोना संक्रमित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबरपर्यंत देशात ११२ कोटी ९७ लाख ८४ हजार कोरोना विरोधी लसीचे डोस देणअयात आले आहेत. आयसीएमआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६२.५७ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून काल दिवसभरात ११.०७ लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील पॉझिटिव्हीटी रेट २ टक्क्यांहून कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here