ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली शेतातून चोरीस

सोनीपत : डबरपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून उसाने भरलेले ट्रॉली चोरीस गेली आहे. या धक्कादायक प्रकाराने गन्नौर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबात संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत डबरपूर येथील शेतकरी सजन अजय नंबरदार यांनी पोलिसांना सांगितले की, ४ एप्रिल रोजी शेतात जाऊन कारखान्याला पाठविण्यासाठी ट्रॉलीमध्ये ऊस भरला आणि ते आपल्या घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन पाहिले तर ट्रॉलीच चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी आसपास ट्रॉलीचा शोध घेतला. मात्र, ती मिळाली नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल नरेश यांनी सांगितले की, शेतातून ट्रॉली चोरीस जाण्याबाबत आलेल्या फिर्यादीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here