ऊसाने भरलेला ट्रक उलटला, दोन तास वाहतूक ठप्प

134

संभल : असमोली ठाण्याच्या हद्दीतील अखबंदपूर गावच्या वळणावर चालकाचा ताबा सुटून उसाने भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. घटनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
असमोली अंतर्गत भवालपूर येथील ऊस खरेदी केंद्रावरून ऊस भरून घेऊन येणारा ट्रक असमोली येथील साखर कारखान्याकडे जात होता. ट्रक अखबंदपूर नजिक पोहोचल्यावर चालकाचा ताबा सुटला. वळणावरील एका पिंपळाच्या झाडावर जाऊन ट्रक आदळला. त्यामुळे तेथे असलेल्या लोकांमध्ये मोठी घबराट उडाली. ट्रकचालकाने उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. दरम्यान, या अपघाताची माहिती साखर कारखान्याला देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताबद्दल कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. साखर कारखान्याकडून आलेल्या दुसऱ्या ट्रकमधून येथील ऊस नेण्यात आला.

दरम्यान, चंदोसी येथील मंडी समितीजवळील ३६ बी रेल्वे फाटकाजवळ एक ट्रक नादुरुस्त झाल्याने दीड तास ट्रॅफिक जाम झाला. रेल्वे फाटकावरील होमगार्ड आणि प्रवाशांनी ट्रक एकाबाजूला आणून लावल्यानंतर दीड तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली. सोमवारी जनदप मुजफ्फरनगर नजिकच्या साजुडा गावचा इरफान हा ट्रक घेऊन बदायूँला गेला होता. तेथून मुजफ्फरनगरला परतताना रेल्वे फाटकानजिक ट्रक नादुरुस्त झाला. चालकाच्या प्रयत्नानंतरही ट्रक सुरू होऊ शकला नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. त्यानंतर होमगार्ड आणि नागरिकांनी ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here