आधार-पॅन कार्ड लिंकिंगसाठी ३१ मार्चची डेडलाइन

नवी दिल्ली : जर तुम्ही आतापर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केलेले नसेल तर ३१ मार्चनंतर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. फायनान्स अॅक्ट २०१७ मधील नियमांत झालेल्या बदलानुसार, आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारने दिलेल्या नव्या मुदतीनुसार तुम्ही ३१ मार्चपर्यंत आधार कार्ड पॅनकार्डशी संलग्न करून घेऊ शकतो. जर असे केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होईल. याशिवाय, तुम्हाला आर्थिक व्यवहारावेळी १० हजार रुपये दंडही लागू केला जाऊ शकतो.

असे करा आधार – पॅनकार्ड लिंकिंग
तुम्ही बायोमेट्रिक आधार व्हेरिफिकेशनअथवा एनएसडीएल, युटीआयटीएलसएलच्या पॅन सेवा केंद्रांवर जाऊन हे लिंकिंग करू शकता. याशिवाय ५६७६७८ अथवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. हा मेसेज युआयडीआयपॅननंतर स्पेस आणि १२ अंकी आधार क्रमांक नंतर स्पेस दहा अंकी पॅन क्रमांक अशा स्वरुपातही ही माहिती पाठवू शकता. विभागाच्या ई- फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in यावरुनही आधार-पॅन लिंकिंग होऊ शकते.

जर तुम्ही पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल तर इन्कमटॅक्स विभाग तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड करू शकते. जर आधार क्रमांकाला पॅनकार्ड लिंक नसेल तर ते पात्र राहाणार नाही. त्यानंतर जिथे पॅनकार्ड अत्यावश्यक असेल, अशा ठिकाणी तुम्ही आर्थिक देवाण-घेवाण करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here