एबीडीचे अनुमान: यावर्षी दहा टक्क्यांपर्यंत राहणार भारताचा आर्थिक विकास दर

31

नवी दिल्ली : एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पडलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर १० टक्के राहील असे अनुमान व्यक्त केले आहे. आशियाई विकास बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी संस्थेने भारताचा आर्थिक विकास दर ११ टक्के राहील अशी शक्यता वर्तविली होती.

एशियन डेव्हलपमेंट बँकेने आपल्या अलिकडच्या आर्थिक दृष्टिकोनातील अहवालात म्हटले आहे की, मार्च २०२२ मध्ये समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्षात भारताच्या विकास दराच्या पूर्व अनुमानात सुधारणा करण्यात आली आहे. कारण कोरोना महामारीच्या कालात वाढलेल्या रुग्णांमुळे आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यात अडथळे आले. राज्यांकडून लॉकडाउनमध्ये सवलती देण्यात आल्यानंतर आणि नियमित व्यवस्था सुरू करण्याच्या दरम्यान गतीने संक्रमण पसरले. त्यामुळे रिकव्हरी होण्यास वेळ लागणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here