पुणे : पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या उसाला चांगला दर मिळायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने दोन साखर कारखान्यातील अंतराची अट त्वरीत रद्द करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. जर सरकारने अंतराची अट रद्द केली नाही तर उसाचा दर ५,००० रुपये प्रती टन करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाटील सांगलीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, या मुद्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. या मागणीला जोर यावा यासाठी माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीदिनी ३ सप्टेंबर २०२३ रोजी पंढरपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या सभेचे आयोजन केले आहे. या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्यकारी अध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नंदकुळे, उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, भारत राष्ट्र समितीचे पश्चिमी महाराष्ट्र संयोजक बी. जे. देशमुख, सहसंयोजक भगीरथ भालके मार्गदर्शन करतील.
रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले की, सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, जर सरकारने ही अट रद्द न केल्यासे उसाचा दर ५,००० रुपये प्रती टन करावा. कांद्यावर निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. कांद्याला ५० रुपये दर द्यावा अथवा कृषीमालांवरील निर्यात निर्बंध हटवावे. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षण अधिनियमात दुरुस्ती करण्याची मागणी केली. म्हैस आणि गाईच्या दुधाला पेट्रोल, डिझेलसारखा दर मिळाला पाहिजे असे ते म्हणाले. तेलंगणा सरकारचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.