‘बीएसएनएल’ चे 78 हजार कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती

स्वेच्छानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत बीएसएनएलच्या 78 हजार 300 कर्मचार्‍यांनी व्हीआरएससाठी अर्ज दाखल केला आहे. 82 हजार कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील असा आमचा अंदाज होता. स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याबरोबरच 6000 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी 3 डिसेंबर हा अखेरचा दिवस अ़़सल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि संचालक पी. के. पुरवार यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दोन्ही कंपन्यांचे एकूण 92 हजार 700 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. यात बीएसएनएलचे 78 हजार 300 कर्मचारी तर एमटीएनएलचे 14 हजार 378 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

एमटीएमएनचे अध्यक्ष तसेच संचालक सुनील कुमार यांनी यासंबंधी सांगितले की, 14 हजार 378 कर्मचार्‍यांनी व्हीआरएससाठी अर्ज दाखल केले आहेत. 13 हजार 650 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील असा आमचा अंदाज होता. परंतु, त्यापेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी व्हीआरएस घेतला आहे. यामुळे वार्षिक वेतन बिल आता 2 हजार 272 कोटी रुपयांऐवजी आता 500 कोटी रुपयांवर पोहोचेल. आता आमच्याकडे केवळ 4 हजार 430 कर्मचारी राहणार असून ते पुरेसे आहेत.

वयाची 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील ‘बीएसएनएल’च्या कर्मचार्‍यांनी या योजनेत सहभाग घेताला. या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणार्‍या रकमेत 25 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here