महाराष्ट्रात गळीत हंगामापूर्वी थकीत ऊस बिले देण्यास गती

64

पुणे : महाराष्ट्रातील ऊस हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी देण्याच्या कामात गती घेतली आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले थकवणाऱ्या साखर कारखान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी कारखानदारांची धडपड सुरू आहे.

हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत १५४ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. आगामी साखर हंगामात सहकारी आणि खासगी असे १९० साखर कारखाने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, एका आठवड्यातच २३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपये एफआरपीपोटी वितरण केले आहेत. तर अद्याप १०० कोटी रुपये एफआरपी प्रलंबित आहे. मात्र आगामी काही दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील असा मला विश्वास वाटतो असे गायकवाड म्हणाले. आता महाराष्ट्रात ९९.०९ टक्के एफआरपी देण्यात आली आहे. पूर्ण एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

चार साखर कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तर आठ कारखान्यांनी ६० ते ८० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. आणखी २४ कारखाने असे आहेत की ज्यांनी ८० ते ९९ टक्के ऊस बिले दिली आहेत. ३० सप्टेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१,२४३ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तर अद्याप शंभर कोटी रुपये प्रलंबित आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here