महाराष्ट्रात ऊस बिले देण्यात गती; ८३ कारखान्यांनी दिले १०० टक्के पैसे

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. या हंगामात ऊस बिले देण्यातही महाराष्ट्रातील कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर शंभर टक्के ऊस बिले अदा करण्याचे प्रयत्न कारखान्यांनी सुरू केले आहेत.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार राज्यातील ८३ साखर कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. तर ४७ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के यांदरम्यान ऊस बिले दिली आहेत. ३३ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के ऊस बिले दिली आहेत. तर २८ कारखाने असे आहेत की त्यांनी ० ते ५९.९९ टक्के यांदरम्यान बिले दिली आहेत.
यंदाच्या गळीत हंगामाची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२१ रोजी झाली होती.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७८०.२३ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७८९.६७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.१२ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here