बिहारमध्ये आडसाली ऊस लागवडीला गती

समस्तीपुर : हसनपूर साखर कारखाना परिसरातील नयानगर गावात शरद ऋतूकालीन आडसाली ऊस लागवडीला सुरुवात करण्यात आली. एकडोळा पद्धतीने ही ऊस लागवड करण्यात येत आहे. एक कांडी पद्धतीने ऊस लावताना प्रती एकर १० क्विंटल ऊस बियाणे गरजेचे असते. या लागवडीत दोन सरीतील अंतर चार फूट असून प्रत्येक कांडीतील अंतर एक फूट असते.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील २० हजार एकरांवर ऊस लागवडीचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कारखान्याचे ऊस विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुग्रीव पाठक यांनी सांगितले की, नयानगर गावातील शेतकरी शैलेशकुमार यांच्या शेतातून आडसाली ऊस लागवडीला सुरुवात करण्यात आली. दोन एकरात कोएस-१४२०१ प्रजातीच्या बियाण्याची लागवड सुरू करण्यात आली. एक डोळा पद्धतीने शेती केल्यास प्रती एकर सहाशे ते सातशे क्विंटल उसाचे उत्पादन मिळते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी ऊस व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, उसाच्या शेतात एकरी २० पोती बायो-कंपोस्ट, डीएपी, पोटॅश, युरिया टाकून लागवड करावी. एक डोळा पद्धतीने उसाची लागवड करण्यासाठी कमी भांडवल लागते. उसाबरोबरच शेतकरी मोहरी, कांदा, बटाटा धने, मसूर, लसूण, कडधान्ये आणि तेलबियांची लागवड करणार आहेत. आंतरपिकाच्या तुलनेत उसाचा खर्च जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा आंतरपिकातून दुहेरी फायदा होतो, असे सहाय्यक ऊस उपाध्यक्षांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here