बरकतपूरच्या उत्तम शुगर मीलमध्ये गाळप क्षमता वाढीच्या कामाला गती

बिजनौर : बरकतपूर येथील उत्तम साखर कारखाना येत्या गळीत हंगामात वाढीव क्षमतेने उसाचे गाळप करणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून नवीन गळीत हंगाम सुरू होत आहे. या हंगामात कारखाना दररोज ८५ हजार क्विंटल उसाचे गाळप करणार आहे. यासाठीचे तांत्रिक काम सुरू असल्याची माहिती साखर कारखान्याचे सहअध्यक्ष नरपत सिंग यांनी दिली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गाळप क्षमता विस्तारीकरणाचे काम उत्तम साखर कारखान्यात गतीने सुरू आहे. आगामी गळीत हंगामात साखर कारखान्याकडून प्रती दिन ७० हजार क्विंटल उसाऐवजी ८५ हजार क्विंटल उसाचे गाळप केले जाणार आहे, असे साखर कारखान्याचे सहअध्यक्ष नरपत सिंग व ऊस महाव्यवस्थापक विकास पुंडिर यांनी सांगितले. कारखान्यात गाळप क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक विकास पुंडिर यांनी सांगितले की, सर्वेक्षणात १५ ते २० टक्के उसाचे रोगाने बाधित झाले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना ०२३८ या प्रजातीवर लाल सड रोगाचा फैलाव झाल्याची माहिती त्यांनी दिली. उसाचे सरव्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना सुधारित वाणांची रोपवाटिका आणि लागवड करण्याचा सल्ला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here