साखर कारखान्यांमध्ये पुन्हा घडला अपघात…

सहानपूर: चिनी मंडी

सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस घेऊन गेलेल्या ठेकेदाराचा चेन मध्ये पडल्यामुळे झाला मृत्यू. ठेकेदारांच्या भावाने जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅक्टर चालक आणि केन लोडर चालकांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

वैसर नावाचा कंत्राटदार शुक्रवारी सकाळी नानौता साखर कारखान्यामध्ये ऊस घेऊन गेला होता. ज्यावेळी तो चैन जवळ ऊभा होता त्याचवेळी एक ऊस भरलेला ट्रॅक्टर मागे घेऊन उस अँलोड करत असताना त्या ट्रॅक्टर ची धडक बसली ज्यामुळे वैसर चैन मध्ये पडला आणि गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर त्वरित अन्य शेतकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नानौता साखर कारखान्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अशा घटना थांबायचे नावाचं घेत नाहीत. या अधी २१ डिसेंबर ला कारखान्यामधें काम करणाऱ्या केमिस्ट चा कारखान्याच्या ओढ्या मध्ये पडून मृत्यू झाला. आणि ५ मार्च ला केन उपलोडरचा पाय घसरल्यामुळे मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here