FRP प्रमाणे ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यांना दिली जाणार नोटीस

157

कोल्हापुर (महाराष्ट्र): उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रा मध्येही अनेक साखर कारखान्यांनी आपली देणी भागवलेली नाहीत. ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या हंगामा दरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळप सत्रात भाग घेतला होता.

गेल्या गाळप हंगामामध्ये जेव्हा साखर कारखाने देणी भागवण्यात अपयशी ठरले होते, तेव्हा त्यांना थकबाकी भागवण्यासाठी नोटीस देण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या पश्चिम परिसरात महापूर आणि मराठवडयात पडलेल्या दुष्काळाचा ऊस पिकावर परिणाम झाला होता, शिवाय मराठवाडयात ऊसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्यात आला. ज्याचा सारा परिणाम राज्याच्या अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर दिसून येत आहे. यामुळे या हंगामात कारखाने अर्थिक संकटाशी सामना करत आहेत.

साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, एफआरपी नुसार थकबाकी न भागवल्यास साखर कारखान्याना नोटीस दिली जाईल. बहुतेक कारखाने एफआरपी नुसार देणी भागवण्याच्या तयारीत आहेत. नियमानुसार ऊस खरेदीच्या 15 दिवसांच्या आत कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे भागवणे आवश्यक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here