नवी दिल्ली : इंडियनश शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामातील साखर निर्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत ११.५३ टक्क्यांहून अधिक झाली आहे. सध्याच्या २०२०-२१ या हंगामाच्या पहिल्या ११ महिन्यात म्हणजेच १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत देशात सुमारे ६६.७० लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत या कालावधीत ५५.७८ लाख टनापेक्षा ही ११ लाख टनाने अधिक निर्यात झाली आहे. चालू हंगामातील आकडेवारीत २०१९-२० या हंगामात एमएईक्यूअंतर्गत केलेली ४.४९ लाख टन साखरेची निर्यातही समाविष्ट आहे. ही मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती.
याशिवाय ६ सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या स्थितीनुसार २.२९ लाख टन साखर बंदरांमध्ये दाखल झाली आहे. ही साखर जहाजावर लोड करण्यात आली आहे. तर काही साखर अद्याप गोदामात असून जहाजांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. चालू हंगामात अद्याप २० दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत एकूण निर्यात ७० लाख टनाच्याही पुढे जाऊ शकते. आतापर्यंत एकूण निर्यात ३४.२८ लाख टन कच्ची साखर, २५.६६ लाख टन पांढरी साखर आणि १.८८ लाख टन प्रक्रिया केलेली साखर निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय, साखर कारखान्यातील रिफायनींग, निर्यातीसाठी बंदरांमधील रिफायनरीत जवळपास ७.१७ लाख टन कच्ची साखर पाठविण्यात आली आहे.
भारताकडून मुख्यत्वे इंडोनेशिया, अफगाणीस्तान, श्रीलंका, सोमालिया, संयुक्त अरब अमिरात, चीन, सौदी अरेबीया, सुदान या देशांना साखर निर्यात केली जाते. इंडोनेशीयात २९ टक्के हिस्सेदारी आहे. अफगाणीस्तानला एकूण १३ टक्के निर्यात केली जाते. सद्यस्थितीत साखरेच्या किमती गेल्या चार वर्षातील उच्चांकावर, २० सेंट-पौंडवर आहेत. ब्राझीलमध्ये गेल्या ९० वर्षातील आतापर्यंतच्या भीषण दुष्काळामुळे पुढील हंगामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आयएसओसह अनेक जागतिक संस्थांनी १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या २०२१-२२ या हंगामात ४ ते ५ मिलियन टन साखरेची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
याशिवाय, थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आगामी हंगामात वाढेल अशी शक्यता आहे. मात्र, तरीही ते १४-१४.५ मिलियन टनापासून सुमारे ३-३.५ मिलियन टन कमी होईल. थायलंडमधील साखर जानेवारी २०२२ नंतर बाजारात येईल. त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांकडे पुढील काही महिन्यापर्यंत २०२२ पर्यंत आणि त्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत ब्राझीलची साखर बाजारात येण्यापूर्वी आपला अतिरिक्त साखर साठा निर्यात करण्याची एक चांगली संधी असेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link