थकीत एफआरपी न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई: जिल्हाधिकारी

सोलापुर: साखरपट्टा म्हणुन ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची ऊस थकबाकी थकवली आहे. ऊस शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे ऊस बिले न दिल्यामुळे ,या कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली जावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
ऊस थकबाकीच्या विषयाबाबत जिल्ह्यातील शेतकरी, सामजिक संघटना, कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर जिल्हाधिकार्‍यांनी बैठक आायेजित केली होती. या बैठकीत विविध मुदयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शंभरकर यांनी कारवाईचे आदेश दिले.

शंभरकर म्हणाले, जे कारखाने एफआरपी प्रमाणे ऊसाचे पैसे देण्यास सक्षम नाहीत, त्यांच्यावर आरआरसीप्रमाणे जप्तीची कारवाई करा. तसेच साखरेचा लिलाव करुन त्यातून जमा होणारी रक्कम शेतकर्‍यांना बिलापोटी द्यावी. तरीही शेतकर्‍यांची बाकी शिल्लक राहात असेल, तर त्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करा.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here