कुशीनगरकडून ऊस बिले उशीरा दिल्यास कारवाई: जिल्हाधिकारी

कुशीनगर : शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी ऊसाची बिलांचे वितरण तातडीने करावे. पैसे देण्यास उशीर झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हाधिकारी एस. राज लिगम यांनी दिले. या हंगामात महापूर आणि लाल सड रोडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेवर दूर कराव्यात असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याचे मुख्याधिकारी वेद प्रकाश सिंह यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या स्थितीबद्दलची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर वेळेवर बिले देण्याचे निर्देश दिले. यासोबतच बंद असलेल्या कप्तानगंज साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना साखर विक्रीसह अन्य स्रोतांमधून पैसे उभे करावेत आणि ते शेतकऱ्यांना द्यावेत असे सांगण्यात आले. हाटा साखर कारखान्याचे व्यवस्थापक संजय त्यागी, रामकोलाचे व्यवस्थापक दिनेश राय, कप्तानगंजचे एस. के. श्रीवास्तव, सेवरहीचे शेर सिंह चौहान, शरद सिंह, खड्डा येथील कुलदिप सिंह आदी उपस्थित होते.

साखर कारखान्यांकडील थकबाकी
जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी आतापर्यंत १७६.७२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांना २३८९५.३७ लाख रुपयांची बिले देण्यात आली आहेत. अद्याप शेतकऱ्यांकडे २३३४०.६० लाख रुपये थकबाकी आहे.

काटामारीचा शेतकऱ्यांचा आरोप
रामकोला येथील त्रिवेणी साखर कारखान्याचे नेबुआ नौरंगिया ब्लॉकमधील परसौनी विद्यालयानजीक ऊस खरेदी केंद्र आहे. येथे ऊसाच्या वजनात घोटाळा करून फसवणूक सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर येथील उसाचे वजन बंद पाडले.
शेतकरी संतप्त झाल्याचे पाहून ऊस खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्त करणाऱ्याला बोलावून वजनकाट्यातील दोष दूर केले. त्यानंतर शेतकरी शांत झाले. मंसाछपरा गावातील संतोष गुप्ता हे ऊस घेऊन वजन करण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे दुसरे एक शेतकरी आपल्या उसाचे वजन करीत होते. त्यांनी वजनात तफावत असल्याची तक्रार केली. त्यानंतर संतोष यांनी आपली ट्रॉली लक्ष्मीपुरी धर्मकाट्यावर नेली. तेथे त्याचे वजन ४५.६० क्विंटल झाले. त्याची पावती घेऊन ते विक्री केंद्रावर आले. तेथे ऊसाचे वजन ४३.१० क्विंटल दिसले. त्याबद्दल तक्रार केल्यावर दुसऱ्यांदा वजन करण्यात आले. यावेळी काट्यावर ४७.५० क्विंटल वजन दिसले. एकाच ट्रॉलीचे वेगवेगळे वजन दिसल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. काटा लिपिक विरेंद्र यादव आणि दुरुस्तीत आलेल्या मेकॅनिकने तांत्रिक अडचणींमुळे समस्या आल्याचे सांगितले. बहादूर कुशवाहा, विनय शर्मा, रामदवन कुसवाहा, शंभू सिंह, अमेरिका कुशवाहा, गुलाब यादव, छोटेलाल आदी शेतकरी उपस्थित होते.

ऊस बिले देण्याची भारतीय किसान युनीयनची मागणी
भारतीय किसान युनीयनच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलांच्या थकबाकीप्रश्नी कप्तानगंज तहसीलसमोर आंदोलन केले. आपल्या चार मागण्यांचे निवेदन तहसीलदार अहमद फरीदखान यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष रामचंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कप्तानगंज साखर कारखाना शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता बंद करण्यात आला आहे. तो पुन्हा सुरू करावा. शेतकऱ्यांना चौदा दिवसात बिले मिळालेली नाहीत. जनपदमधील सर्व साखर कारखाने ऊस संपल्याशिवाय बंद करू नयत अशी मागणी केली. युनीयनचे जिल्हा सचिव चेतई प्रसाद, संजय कुशवाहा, गुड्डू कुशवाहा, अॅड. मिर्जा एक्तेदार हुसैन, रामअधार प्रसाद, विठ्ठल प्रसाद, धीरज मौर्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here