ऊस थकबाकी न देणार्‍या साखर कारखान्यांवर कारवाई करावी: श्यामवीर त्यागी

सहारनपूर : भारतीय किसान संघाचे प्रदेश संयोजक श्यामवीर त्यागी म्हणाले की,राज्य सरकारने शेतकर्‍यांची थकबाकी थांबवणार्‍या कारखान्यांवर कारवाई करावी. त्यांनी सांगितले की, कोविड 19 मुळे शेतकर्‍यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे. राज्यातील साखर कारखाने शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे देत नाहीत. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने शेतकर्‍यांची ही अवस्था पाहता वीजेचे बिल आणि बँक कर्जावरील व्याज माफ करावे. त्यागी म्हणाले, पॉवर कॉर्पोरेशन आणि बँकांद्वारे शेतकर्‍यांची आरसी जारी करुन त्यांना त्रास दिला जात आहे.

याबाबत सरकारने गंभीरता दाखवून ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. लवकरच शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ डीएम यांना भेटणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here